क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात प्रवेशोत्सव फेरी उत्साहात | पुढारी

क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात प्रवेशोत्सव फेरी उत्साहात

म्हसवड : पुढारी वृत्तसेवा येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची म्हसवड शहरातून लेझीम व ढोल-ताशांच्या गजरात प्रवेशोत्सव प्रभातफेरी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. या प्रभात फेरीत शैक्षणिक जनजागृती करण्यात आली. यावेळी शिकेल तो टिकेल, पाणी आडवा पाणी जिरवा, पर्यावरण रक्षण हेच खरे मूल्यशिक्षण, पर्यावरण वाचवा भविष्य घडवा, पर्यावरण बचे तो प्राण बचे, जलसंरक्षण, प्रदूषण टाळा, झाडे लावा झाडे जगवा, चला चला शाळेला चला असे विविध संदेश फलकाद्वारे देण्यात आले.

प्रवेशोत्सव फेरीमध्ये थोर व्यक्तींची वेशभूषा करून अनोखे संदेश देण्यात आले. यावेळी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्राथमिक शाळा, क्रांतिवीर इंग्लिश मीडियम स्कूल, क्रांतिवीर ज्युनिअर कॉलेज, आत्मगिरी माध्यमिक विद्यालय या सर्व विभागात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य विठ्ठल लवटे, राहुल फुटाणे, मुख्याध्यापक अनिल माने, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

Back to top button