१९ वे समरसता साहित्य संमेलन नागपुरला ; नाशिकमधून शेकडोजण जाणार | पुढारी

१९ वे समरसता साहित्य संमेलन नागपुरला ; नाशिकमधून शेकडोजण जाणार

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

समरसता साहित्य परिषद , महाराष्ट्र आयोजित १९ वे समरसता साहित्य संमेलन दि. २ व ३ जुलै रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरी, वसंतराव देशपांडे सभागृह, सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे आयोजित केले आहे. या संमेलनासाठी नाशकातून शेकडो कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती प्रांत सदस्य गजानन होडे, समरसता मंचाचे नाशिक विभागाचे कार्यकर्ते नाना बच्छाव यांनी दिली.

समरसता साहित्य संमेलना निमित्त नाशिक विभागाची बैठक नाशकात संपन्न झाली. या बैठकीला प्रांत सदस्य गजानन होडे, समरसता मंचाचे नाशिक विभागाचे कार्यकर्ते नाना बच्छाव यांनी मार्गदर्शन केले. समरसता साहित्य संमेलन विषयी माहिती देण्यात आली. संमेलनाचे उद्घाटन दि. २ जुलै रोजी सकाळी १० वाजता माजी खासदार तरुण विजय यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. अक्षयकुमार काळे भूषविणार आहेत. संमेलनाचे स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ते पदमश्री गिरीश प्रभुने, समरसता साहित्य परिषद महाराष्ट्र चे अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदपुरे, कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील उपस्थित राहणार आहेत. संमेलनात ग्रंथदिंडी, विविध प्रदर्शने, परिसंवाद निमंत्रित कवीचे संमेलन या सह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचा समारोप दि. ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. या संमेलनात नाशकातून शेकडो कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन समरसता साहित्य परिषदेचे प्रांत अध्यक्ष डॉ. ईश्वर नंदापुरे, कार्यवाह डॉ. प्रसन्न पाटील व प्रांत सदस्य गजानन होडे, समरसता मंचाचे नाशिक विभागाचे कार्यकर्ते नाना बच्छाव, निलेश खैरनार यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button