मनमाड (जि. नाशिक) : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मनमाड आणि अंकाई किल्ला स्थानकावर यार्ड रिमॉडलिंगच्या कामासाठी रेल्वेने ब्लॉक घेतला असून अंकाईजवळ ९ तर मनमाड स्थानकाजवळ १० दिवसांचा हा ब्लॉक राहणार आहे. त्यामुळे या काळातील ४६ प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. परिणामी आता प्रवाशांना इतर गाड्यांचा आधार घ्यावा लागणार आहे. अशी माहिती वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक शिवराज मानसपुरे यांनी दिली.
तारखेनुसार रद्द झालेल्या गाड्या
नांदेड-मनमाड एक्स्प्रेस ही गाडी १९ ते २७ जूनपर्यंत मनमाड-नांदेड २० ते २८, मनमाड-मुंबई २५ ते २८, मुंबई ते मनमाड २६ ते २९, काकीनाडा साईनगर शिर्डी २५ ते २७, साईनगर शिर्डी-काकीनाडा २६ ते २८, सिकंदराबाद-मनमाड २४ ते २६, मनमाड-सिकंदराबाद २५ ते २७, सिकंदराबाद- मनमाड २५ ते २४ ते २७, येलहंका – काचीगुडा २४ ते २७, दौंड निजामाबाद २५ ते २८, निजामाबाद – पुणे २४ ते २७, विशाखापट्टनम-साईनगर शिर्डी २३ जून, साइनगर शिर्डी – विशाखापट्टनम २४ जून, साईनगर शिर्डी-कालका २८ जून, कालका-साईनगर शिर्डी २६ जून, सीएसएमटी-जालना २५ ते २८ जून, जालना-सीएसएमटी २६ ते २९ जून, अजनी-पुणे २६ जून, पुणे- अजनी २५ जून, सीएसएमटी- २७ व २८ जून, आदिलाबाद-सीएसएमटी २६ व २७ जून, सिकंदराबाद सीएसएमटी २७ व २८ जून, सीएसएमटी- सिकंदराबाद २६ व २७, दादर-साईनगर शिर्डी २७ जून, साइनगर शिर्डी-दादर २८ जून, हडपसर नांदेड २७ जून, नांदेड-हडपसर २६ जून, सीएसएमटी-नांदेड २७ व २८ जून, नांदेड सीएसएमटी २६ व २७, दरभंगा-मनमाड २७ व २८, मनमाड-दरभंगा २७ व २८, पुणे-दरभंगा २७ जून इतर गाड्या आहेत.