धुळे : जवाहर सुतगिरणीत कुणाल पाटील यांच्या पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध; भाजपला झटका | पुढारी

धुळे : जवाहर सुतगिरणीत कुणाल पाटील यांच्या पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध; भाजपला झटका

धुळे : पुढारी वृत्तसेवा : धुळे येथील जवाहर सूतगिरणीच्या निवडणुकीत आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखालील जवाहर शेतकरी पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने भाजपाप्रणित विरोधी पॅनलला निवडणुकीच्या सुरुवातीलाच चांगला झटका दिला आहे. दरम्यान भाजपाप्रणित पॅनलला सूचक, अनुमोदकच मिळाला नसल्याने जवाहर शेतकरी पॅनलचे अमर शिवाजी देसले, गणेश सिताराम चौधरी, सर्जेराव मखा पाटील हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

जवाहर शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज (दि.२१) अंतिम मुदत होती. त्यानुसार सुतगिरणीच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी माजी मंत्री रोहिदास पाटील आणि आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवाहर पॅनलने आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍याकडे दाखल केले. त्यात कापूस उत्पादक शेतकरी या मतदारसंघातून आ. कुणाल रोहिदास पाटील, कन्हैयालाल नानजी पाटील, दत्तात्रय निळकंठ परदेशी, बाबाजी कृष्णा देवरे, प्रमोद बाबुराव कचवे, प्रमोद दुलिचंद जैन, संतोष पंढरीनाथ पाटील, अविनाश भावराव पाटील, नानाभाऊ हिराजी माळी, रमेश लाला पाटील, जितेंद्र रुपसिंग पवार, नागेश नामदेव देवरे, नंदू भालेराव पाटील, दरबारसिंग नारायण गिरासे, बाजीराव हिरामण पाटील, यशवंत दामू खैरनार, गुलाब धोंडू कोतेकर, अनिल बाबुराव कचवे.

बिगर कापूस उत्पादक शेतकरी मतदारसंघातून पाटील सर्जेराव मखा, महिला प्रतिनिधी म्हणून पाटील प्रतिभा पंढरीनाथ, ठाकरे नंदिनी प्रविण, इतर मागावर्गीय मतदारसंघातून कुणाल दिगंबर पाटील, विजय संभाजी पाटील, गुलाब धोंडू कोतेकर, एस.सी/एस.टी. मतदारसंघातून रमेश राघो पारधी, अमृत रमेश भिल, भटक्या विमुक्त जाती जमाती मतदारसंघामधून भिका विठ्ठल पाटील, सोमनाथ शामला पाटील आणि बिगर कापूस उत्पादक मतदारसंघातून गणेश सिताराम चौधरी, अमर शिवाजी देसले यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी भाजपाप्रणित विरोधी पॅनलला तीन जागांसाठी सूचक, अनुमोदक आणि उमेदवारच मिळाला नसल्याने आ. कुणाल पाटील यांच्या जवाहर शेतकरी पॅनलचे तीन उमेदवार बिनिविरोध निवडून आले आहेत. त्यात अमर शिवाजी देसले, गणेश सिताराम चौधरी, सर्जेराव मखा पाटील या तिघा उमेदवारांचा समावेश आहे.

अडचणीच्या काळातही सक्षमपणे सुरु असलेला सुतगिरणीसारखा चांगला प्रकल्प बंद पाडण्याचे कपट आणि कामगारांचे भवितव्य उद्ध्वस्त करण्याचा विरोधकांचे कारस्थान जवाहर पॅनल उधळून लावत पुन्हा एकदा जवाहर शेतकरी पॅनलचे सर्व उमेदवार विजयी होतील. कोरोनाच्या काळात राज्यातील आणि देशातील अनेक सुतगिरणी, कारखाने, कंपन्या बंद पडल्या, लाखो कामगार बेरोजगार झाले. मात्र, आ. कुणाल पाटील यांनी जवाहर सुतगिरणीला तेवढ्याच खंबीरपणे चालवत कामगारांना रोजगार देण्याचे काम केले आहे. मात्र, सुस्थितीत चालणार्‍या प्रकल्पात राजकारण आणून तो कसा बंद पडेल, असा विरोधकांचा डाव असून तो जवाहर पॅनल हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया यावेळी उमेदवारांनी व्यक्त केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button