नाशिक : जांभळाचा मोह बेतला जीवावर, झाडावरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : जांभळाचा मोह बेतला जीवावर, झाडावरुन पडल्याने तरुणाचा मृत्यू

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
जांभूळ तोडण्यासाठी झाडावर चढलेल्या तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील सुळेवाडी येथे मंगळवारी (दि.14) दुपारी 3 च्या सुमारास घडली. अमित सोमनाथ जाधव (26) असे मृत तरुणाचे नाव आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुळेवाडी येथे अमित जाधव हा तरुण जांभूळ तोडण्यासाठी झाडावर चढला. जांभूळ तोडत असताना त्याचा तोल जाऊन तो खाली पडला व गंभीर जखमी झाला. कुटुंबीयांनी त्याला तत्काळ उपचारार्थ सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तथापि उपचारांपूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, अमित जाधव यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा :

Back to top button