चुकीचे इंजेक्शन दिल्याने महिलेची दृष्टी गेली? | पुढारी

चुकीचे इंजेक्शन दिल्याने महिलेची दृष्टी गेली?

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयात मोती बिंदूची शस्रक्रिया करण्यासाठी आलेल्या रमिला पुरुषोत्तम वाघेला (58) या महिलेची दृष्टी गेल्याचा धक्‍कादायक प्रकार समोर आला आहे. शिकाऊ डॉक्टरने चुकीचे इंजेक्शन दिल्याने दृष्टी गमावावी लागल्याचा आरोप मुलगा महेश वाघेला यांनी केला आहे. त्याने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली आहे.

सहारगाव येथे राहणारी रमिला पुरुषोत्तम वाघेला यांना 31 मे रोजी डकूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 1 जूनला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया झाली. दुसर्‍या दिवशी घरी गेल्यावर डोकेदुखी, उलटी येणे असा त्रास सुरु झाला. त्यानंतर पुन्हा त्यांना कूपर रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले. त्यांची डोळ्यावरची पट्टी काढल्यानंतर डोळ्यातील पडद्यामध्ये छिद्र पडल्याचे दिसून आले. वैद्यकीय अधिक्षक शैलेश मोहिते यांनी पुन्हा शस्रक्रिया करण्याचे आश्‍वासन देत कुठेही याची वाच्यता न करण्यास सांगितले. यानंतर डोळ्यावर तीन ते चार वेळा शस्रक्रिया केल्या. परंतु तरीसुध्दा दृष्टी आली नाही. नागरिकांच्या जीवाशी खेळणाया डॉक्टरांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वाघेला यांनी केली आहे.

दोन्ही शिकाऊ डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. कुठलाही हलगर्जीपणा झालेला नाही. यामुळे कुणावर कारवाई करण्याचा प्रश्न उद्दभवत नाही.
असे  शैलेश मोहिते, वैद्यकीय अधिक्षक, कूपर रुग्णालय यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button