नाशिक : जिल्ह्यात कोणत्या धरणात किती पाणीसाठा? | पुढारी

नाशिक : जिल्ह्यात कोणत्या धरणात किती पाणीसाठा?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाने दिलेल्या ओढीने धरणांमध्ये केवळ 27 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिककरांचे हक्काचे गंगापूर 29 टक्के भरले असून, गेल्या वर्षी याच काळात धरणात 1643 दलघफू (40 टक्के) पाणीसाठा शिल्लक होता.

दोन दिवसांपासून तळकोकणासह मुंबई-पुण्यात मान्सून सक्रिय झाला असून, किनारपट्टीच्या भागाला त्याने झोडपून काढले. पण नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात अद्यापही मान्सून पूर्ण क्षमेतेने सक्रिय झालेला नाही. परिणामी पावसाची पाठ आणि उकाड्याने जिल्हावासीय हैराण झाले आहेत. त्यातच दुसरीकडे जिल्ह्यातील प्रमुख 24 धरणांमध्ये सध्या 17,709 दलघफू उपयुक्त साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा 16573 दलघफू (25 टक्के) होता. नाशिककरांची तहान भागविणार्‍या गंगापूरमध्ये 1643 दलघफू साठा आहे. 2021 मध्ये आजच्या दिवशी धरण 40 टक्के भरलेले होते. तर समूहात 2613 दलघफू म्हणजेच 26 टक्के साठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत 2 टक्के तूट आहे. दारणा समूहातील सहा प्रकल्प मिळून 4680 दलघफू म्हणजे 25 टक्के साठा शिल्लक आहे. पालखेड समूहात तीन प्रकल्पांतून 1358 दलघफू (16 टक्के), तर ओझरखेड समूहात 666 दलघफू साठा आहे. चणकापूर समूहात 7951 दलघफू व पुनद समूहात 233 दलघफू (14 टक्के) पाणी आहे.

धरणसाठा (दलघफू)
गंगापूर 1643, दारणा 1347, काश्यपी 374, गौतमी 570, आळंदी 26, पालखेड 179, करंजवण 1063, वाघाड 116, ओझरखेड 589, पुणेगाव 77, भावली 55, मुकणे 2640, वालदेवी 117, कडवा 268, नांदूरमध्यमेश्वर 253, भोजापूर 25, चणकापूर841, हरणबारी 239, केळझर 28, गिरणा 6843, पुनद 233.

हेही वाचा :

Back to top button