कांदाप्रश्नी लासलगावी प्रहारचे आंदोलन ; पंतप्रधानांना पत्र पाठवून केली ‘ही’ मागणी | पुढारी

कांदाप्रश्नी लासलगावी प्रहारचे आंदोलन ; पंतप्रधानांना पत्र पाठवून केली 'ही' मागणी

लासलगाव (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा

कांद्याला हमीभाव मिळावा या करिता लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रहार जनशक्तीच्या वतीने भव्य आंदोलन करण्यात आले. तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून कांद्याला ३ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

या आंदोलनाप्रसंगी प्रहार जनशक्ति उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तु बोङके, जिल्हाअध्यक्ष शरद शिंदे, सागर निकाळे, दत्ता आरोटे, समाधान बागल, शाम गोसावी, निफाङ अध्यक्ष दिगंबर वङघुले, राहुल सोनवने, उपशहरअध्यक्ष शेरखान मुलानी, अरुण थोरे, नाना सांगळे आदी उपस्थितीत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्रात शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, प्रती किलो कांदा पिकवण्यासाठी साधारण २० ते २५ रुपये किलो खर्च येत असून सध्या कांद्याला सरासरी आठ ते दहा रुपये किलो भाव मिळत आहे. मिळणाऱ्या दरातून झालेला खर्चही निघत नसल्याने आर्थिक बजेट पूर्णता कोलमडले आहे. आपण नाफेडच्या माध्यमातून ३० रुपये किलोने कांदा खरेदी करावा आणि मार्च ते मे महिन्यात विक्री झालेल्या कांद्याला ५०० रुपये क्विंटल अनुदान द्यावे अशी मागणी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button