पुढारी ऑनलनाईन डेस्क : विधान परिषद निवडणूक २० जून राेजी होणार आहेत. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज ( दि. १3) अखेरचा दिवस आहे. राज्यसभा निवडणूकीनंतर आता विधान परिषद निवडणुकीसाठी भाजप विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.
विधान परिषदेच्या एकूण १० जगांसाठी महाविकास आघाडीचे प्रत्येकी २ तर भाजपचे ५ तर एक भाजप पुरस्कृत अपक्ष १ असे १२ उमेदवार रिंगणात उतरणार आहेत. आता या निवडणुकीत भाजपाकडून माघार घेतली जाणार का ? मविेआचे नेते फडणवीस यांची भेट घेण् का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सहाव्या उमेदवाराची घोषणा
भाजपाने आपल्या सहाव्या उमेदवाराची घोषणा केली आहे. सदाभाऊ खोत यांचा सहावे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. यामूळे १० जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात आहेत. तर राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांचा अर्ज आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घोषणा केली आहे. तर शिवाजी गर्जे यांचा तिसरा डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.
शिवसेना : सचिन अहिर, आमश्या पाडवी
राष्ट्रवादी :एकनाथ खडसे,रामराजे नाईक निंबाळकर
काँग्रेस : भाई जगताप,चंद्रकांत हंडोरे
भाजप : प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रसाद लाड,उमा खापरे, सदाभाऊ खोत
हेही वाचा