नाशिक : कंपनी व्यवस्थापकाच्या खूनप्रकरणी चौघांना दोन दिवसांत अटक | पुढारी

नाशिक : कंपनी व्यवस्थापकाच्या खूनप्रकरणी चौघांना दोन दिवसांत अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

अंबड औद्योगिक वसाहतीत कंपनीचे व्यवस्थापक नंदकुमार आहेर यांच्या खून प्रकरणी अंबड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले व दोन जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अंबड पोलिसांनी खून झाल्यानंतर ४८ तासाच्या आत या चार ही संशयितांना जेरबंद केले आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीत मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास सिमेन्स कंपनी जवळ आहेर इंजिनिअरींग कंपनीच्या प्रवेशद्वारावर चार जणांनी आहेर यांच्यावर तलवारीने वार करुन त्यांना ठार केले. या घटनेनंतर पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे व पोलिस उपायुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक श्रीकांत निबांळकर, पोलिस निरीक्षक नंदन बगाडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश शिंदे व पोलिस उपनिरीक्षक संदिप पवार यांनी या घटनेतील पहिला अल्पवयीन जखमी आरोपी पहिल्याच दिवशी ताब्यात घेतला. या नंतर या घटनेतील दुसरा आरोपी सिद्धार्थ उर्फ गोलू जगदीश गायकवाड (वय २१) रा. चाळीसगाव याला बुधवारी रात्री चाळीसगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली. तर तिसरा आरोपी पियुष अशोक माळोदे  (वय १९) रा. मारुती संकुल दत्तनगर व चौथा अल्पवयीन मुलगा याला गुरुवारी सकाळी अंबड पोलिसांनी दत्तनगर भागातून ताब्यात घेतले. या चौघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे. घटनेचा पुढील तपास अंबड पोलिस करत आहे.

हेही वाचा :

Back to top button