पिंपरी: सावित्रीबाई फुले इमारतीमध्ये प्रशासकीय प्रशिक्षण संस्था: आयुक्त राजेश पाटील यांची मान्यता | पुढारी

पिंपरी: सावित्रीबाई फुले इमारतीमध्ये प्रशासकीय प्रशिक्षण संस्था: आयुक्त राजेश पाटील यांची मान्यता

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा

स्पर्धा परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेतर्फे गांधीनगर, पिंपरी येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक इमारतीमध्ये नव्याने पिंपरी-चिंचवड प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी येणार्‍या खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंगळवारी (दि.7) मान्यता दिली.

ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर पालिका नव्याने प्रशिक्षण संस्था सुरू
करत आहे. संस्थेत 100 विद्यार्थ्यांना पूर्वपात्रता परीक्षा घेऊन प्रवेश देणे, एसआयएसी परीक्षेत पास होणार्‍या 50 विद्यार्थ्यांना थेट प्रवेश देणे तसेच शहरातील स्थानिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी स्थानिक पातळीवर परीक्षा घेऊन 50 विद्यार्थ्यांची निवड करणे, अशी या केंद्राची प्रक्रिया असणार आहे.

खडी फोडण्याची नव्हे, फोडलेल्या खडीची शिक्षा, खराब रस्त्यामुळे प्रवाशांचे हाल

केंद्रासाठी आवश्यक संदर्भ ग्रंथ, पुस्तके, नियतकालिके, नकाशे व साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना व्याख्यान देण्यासाठी अनुभवी प्राध्यापक, व्याख्याते व परीक्षकांची तासिका पद्धतीने नियुक्ती करण्यात येणार आहे. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे यासाठी मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात येणार आहे.

तज्ज्ञांना मानधन अदा केले जाणार आहे. प्रशासकीय केंद्राची रचना व कार्यप्रणाली केली जाणार आहे. निवड झालेल्या 100 विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाणार आहे. त्यासाठी आवश्यक खर्चास आयुक्त पाटील यांनी मान्यता दिली.

हेही वाचा

वायू प्रदूषण रोखण्यासाठी पुण्याला 504 कोटी

Nashik : वैतरणा धरणग्रस्तांचे प्रश्न सोडवणार- जलसंपदामंत्री पाटील यांचे आश्वासन

मच्छरमार अगरबत्ती वापरताय? सावधान!

Back to top button