बारावी परीक्षेत नाशिक विभागात धुळे अव्वल, तर नाशिक… | पुढारी

बारावी परीक्षेत नाशिक विभागात धुळे अव्वल, तर नाशिक...

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.8) जाहीर झाला. नाशिक विभागीय मंडळाचा निकाल 95.03 टक्के इतका लागला असून, धुळे जिल्हा 96.36 टक्क्यांंसह विभागात अव्वल ठरला. तर नाशिक जिल्हा 92.65 टक्क्यांसह विभागात सर्वांत शेवटी फेकला गेला. यंदाच्या निकालातही दरवर्षीप्रमाणे मुलींनी बाजी मारल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर इयत्ता बारावीच्या लेखी परीक्षाही ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या. नाशिक विभागातील सुमारे एक हजार कनिष्ठ महाविद्यालयातून 1 लाख 64 हजार 962 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

क्षात लेखी परीक्षा दिली. त्यापैकी तब्बल 1 लाख 54 हजार 764 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये 85 हजार 374 मुलांचा तर 67 हजार 255 मुलींचा समावेश आहे. संपूर्ण विभागात मुलींचा निकाल 96.16 टक्के तर मुलांचा 94.14 टक्के निकाल लागला आहे. नाशिक विभागात धुळे जिल्ह्याचा सर्वाधिक 96.37 टक्के इतका तर नाशिक जिल्ह्याचा सर्वांत कमी 92.65 टक्के इतका निकाल लागला आहे. जळगाव जिल्ह्यात 95.46 टक्के तर नंदुरबार जिल्ह्यात 95.63 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विभागातील 28 हजार 64 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह प्रथम श्रेणीत, 73 हजार 808 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, 45 हजार 786 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर 4 हजार 971 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत पास झाले आहेत. दरम्यान, परीक्षा कालावधीत 60 गैरमार्ग प्रकरणे घडली होती. नाशिकमध्ये सर्वाधिक 22 गैरप्रकरणे उघडकीस आली होती. त्यापैकी 37 विद्यार्थ्यांचे संपदणूक रद्द करण्यात आली आहे. एका विद्यार्थ्याला पुढील परीक्षेसाठी डिबार करण्यात आले आहे. एका डमी प्रकरणासह चौघा विद्यार्थ्यांची चौकशी सुरू असून, त्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आले आहेत. तर 19 विद्यार्थ्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे.

जिल्हानिहाय निकाल : नाशिक- 92.65, धुळे- 96.43, जळगाव- 95.46, नंदुरबार- 95.63

हेही वाचा :

Back to top button