संत सोपानकाका महाराजांच्या पालखी, रथाला झळाळी | पुढारी

संत सोपानकाका महाराजांच्या पालखी, रथाला झळाळी

सासवड : पुढारी वृत्तसेवा

आषाढ वारी पालखी सोहळ्यासाठी संत सोपानकाका महाराजांच्या चांदीच्या पालखी व रथाला झळाळी देण्याचे काम सासवड येथील संत सोपानकाका महाराजांच्या संजीवन समाधी मंदिर परिसरात सुरू आहे. पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला असून, यासाठी संत सोपानदेव मंदिर ट्रस्ट आणि संत सोपानकाका सहकारी बँकेच्या वतीने सर्व यंत्रणा सज्ज करण्यात येत आहे.

नाशिक : वाहनाची धडक; पादचारी ठार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन वर्षांनी हा पायी वारी सोहळा होत असल्याने वारकरी बांधवांमध्ये उत्साही वातावरण आहे. या अनुषंगाने संत सोपानकाका महाराजांचा चांदीचा पालखी रथ आणि पालखीला मंगळवारी (दि. 7) उजाळा देण्याचे काम जोमाने सुरू आहे. पालखीला व्यवस्थित घासून त्यावर विशिष्ट प्रकारचे लेपण करून झळाळी दिली जात आहे. याबरोबरच रथाची चाके व इतर गोष्टींची दुरुस्ती करून घेतली जात असल्याची माहिती देवस्थानचे प्रमुख अ‍ॅड. त्रिगुण महाराज गोसावी यांनी दिली.

वेल्ह्यातील गट, गण जैसे थे; नावात बदल

यंदा सोहळा उत्साहात साजरा केला जाणार असल्याने संत सोपानकाका महाराजांच्या मंदिरात विविध विकासकामे केली जात असून, संत सोपानकाका सहकारी बँकेने 18 लाखांची देणगी दिली आहे. संत जनाबाई यांचे मंदिर उभारले जात आहे. तसेच, संत तुकाराम महाराजांच्या ओट्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, लवकर या ओट्याचे काम पूर्ण होत असल्याचेही अ‍ॅड. गोसावी यांनी सांगितले.
सासवड येथे संत सोपानकाका महाराजांच्या चांदीच्या पालखी रथाला व पालखीला झळाळी देण्याचे सुरू असलेले काम.

Back to top button