नाशिक : जिल्हा बँक माजी संचालकांची चौकशी सुरू | पुढारी

नाशिक : जिल्हा बँक माजी संचालकांची चौकशी सुरू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्ज वितरण, खरेदी, नोकरभरती आदींच्या चौकशीला पोलिस महासंचालकांनी परवानगी दिली असून, त्यानुसार 29 माजी संचालकांच्या चौकशीला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीला सुरुवात झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा बँक तसेच सहकार विभागाला पत्र पाठवण्यात आले असून, या संचालकांनी केलेल्या भ्रष्टाचाराची माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश मोहिते यांच्या पाठपुराव्यानंतर सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने बँकेचे संचालक मंडळ लोकसेवक संज्ञेत मोडत असल्याने भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार चौकशीला परवानगी दिली होती. त्यामुळे संचालक मंडळाच्या कोणत्याही सदस्याविरुद्ध आरोप असलेल्या गुन्ह्याची भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, 1988 चे कलम 17 अ नुसार चौकशीस हरकत नसल्याचे पत्र सहकार विभागाने दिले होते. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता मुंबईतील लाचलुचपत विभागाच्या महासंचालकांकडे चौकशीसाठी परवानगी मागितली होती. त्याला महासंचालकांनी गत आठवड्यात मंजुरी दिली होती. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता या माजी 29 संचालकांच्या गैरकारभाराच्या चौकशीला प्रारंभ केला आहे. त्यांनी सहकार निबंधक तसेच जिल्हा बँकेला पत्र पाठवत, या संचालकांवर असलेल्या आरोपांबाबतची संपूर्ण माहिती सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा:

Back to top button