नायजेरियामध्ये चर्चवर हल्ला; ५० हून अधिक ठार | पुढारी

नायजेरियामध्ये चर्चवर हल्ला; ५० हून अधिक ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : नायजेरियातील ओवो शहरात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात ५० हुन अधिक लोकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये अनेक मुलांचाही समावेश आहे.

नायजेरियातील ओंडो राज्यातील ओवो शहरामध्ये असणाऱ्या सेंट फ्रान्सिस कॅथॉलिक चर्चमध्ये सकाळी हे हत्याकांड झाले आहे. जिथे ही घटना घडली त्या नायजेरियाच्या नेऋत्य भागात अनेक अनेक जिहादी आणि गुन्हेगारी टोळ्या आहेत. याबद्दल पोप फ्रान्सिस यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून त्यांनी यावेळी पीडित आणि देशासाठी प्रार्थना केली. तसेच राष्ट्रपती मुहम्मद बुहारी यांनी हे घृणास्पद हत्याकांड असल्याचे नमूद करत तीव्र निषेध केला आहे. हल्लेखोरांचा हेतू स्पष्ट झालेला नसून अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतलेली नाही.

हे वाचलंत का ?

Back to top button