नाशिक : विवाहासाठी वर्‍हाडासोबत आलेली तरुणी झाली बेपत्ता, सर्वत्र खळबळ | पुढारी

नाशिक : विवाहासाठी वर्‍हाडासोबत आलेली तरुणी झाली बेपत्ता, सर्वत्र खळबळ

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील वाळविहीर येथे एका विवाहासाठी घाटघर (ता. अकोले, जि. अ.नगर) येथून वर्‍हाडाबरोबर आलेली तरुणी विवाह लागण्याच्या सुमारास अचानक बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तरुणीच्या वडिलांनी घोटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

घाटघर येथील राजू चिमा सुरनर यांची मुलगी संजना राजू सुरनर (18) वाळविहीर येथील नातेवाइकांच्या विवाहासाठी 21 मे रोजी वर्‍हाडाच्या गाडीत मैत्रिणीबरोबर आली होती. मात्र विवाह समारंभ आटोपल्यानंतर संजना सुरनर अचानक गायब झाली असल्याची बाब समोर आली. संजनाच्या वडिलांनी तिचा नातेवाइकांकडे शोध घेतला. मात्र संजना मिळून न आल्याने अखेर राजू सुरनर यांनी 24 मे रोजी घोटी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती.
या तक्रारीची घोटी पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे राजू सुरनर यांनी नाशिक ग्रामिण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्याकडे याबाबत तक्रार दिली. मुलगी ज्या मैत्रिणीसोबत लग्नाला गेली, त्या मैत्रिणीच्या ओळखीचे इसम सीताराम हुलगुंडे, कुशी गणपत गुडनर, पिंटी गणपत गुडनर (रा. नांदगाव, ता. जव्हार) यांनी तिला वर्‍हाडामधून फसवून नेल्याचे सुरनर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

संशयित हुलगंडे व इतरांची चौकशी करावी व मुलगी संजना हिचा शोध घेऊन संशयितांवर योग्य ती कारवाई करावी, अशी तक्रार अशीही मागणी राजू सुरनर यांनी केली आहे.

हेही वाचा :

Back to top button