नाशिकमध्ये चाललंय तरी काय ? दगडाने ठेचून आणखी एका युवकाचा खून | पुढारी

नाशिकमध्ये चाललंय तरी काय ? दगडाने ठेचून आणखी एका युवकाचा खून

नाशिक : शहरातील गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत (पाईपलाईन रोडवर) एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. दगडाने ठेचून या युवकाचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला महिला पोलिस कर्मचारी खैरनार यांनी अटक केली आहे.

पवन नथु पगारे असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर याप्रकरणी संशयित आरोपी अतुल अजय सिंग यास ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, महिला पोलिस कर्मचारी सरला खैरनार यांच्यावरही वार करण्याचा प्रयत्न झाल्याचे समजते. घटनास्थळी पोलिस आयुक्तांनी भेट दिली असून सुमारे सतरा दिवसांमध्ये शहरातील हा सातवा खून आहे. शहरातील एकामागून एक सुरु असलेल्या खून सत्रामुळे नाशिक पुरते हादरले असून, आज झालेल्या या खुनामुळे पुन्हा एकदा नाशिकमध्ये खळबळ पसरली आहे.

युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ पसरली आहे.
घटनास्थळी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी भेट दिली.

हेही वाचा :

Back to top button