राज्यातील पहिल्या इलेक्ट्रिक एसटीचा लोकार्पण सोहळा संपन्न | पुढारी

राज्यातील पहिल्या इलेक्ट्रिक एसटीचा लोकार्पण सोहळा संपन्न

पुणे : पुढारी वृत्तसेवा

पुण्यातील शंकर शेठ रोड येथील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात राज्यातील पहिल्या एसटी महामंडळाच्या इलेक्ट्रीक बसचा ( शिवाई) लोकार्पण सोहळा पार पडला. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तर नगर मध्ये राज्यात 1 जून 1948 साली सुरू झालेल्या एसटी बसचे वाहक लक्ष्मण केवटे यांच्या हस्ते बुधवारी झाले.

रशियन तेल आयातीत दोन तृतीयांश कपात करणार युरोपीय संघ

शंकरशेठ रोड येथील एसटीच्या कार्यालयातील वडाच्या झाडाखालून 1 जून 1948 रोजी राज्यातील पहिली एसटी बस पुणे-नगर या मार्गावर धावली होती, आणि आता येथुनच राज्यातील पहिली इलेक्ट्रिक बस त्याच मार्गावर धावणार आहे. त्यामुळे एसटी महामंडळाकडून येथे स्मरणासाठी कोनशीला उभारण्यात आली. तिचेही उदघाटन उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे परिवहन मंत्री ऍड. अनिल परब यांच्या हस्ते झाले.

मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दाखल; पुढील दोन ते तीन दिवसांत कोकण आणि गोव्यात पोहोचणार

यावेळी पुण्यातील कार्यक्रमात परिवहनमंत्री अनिल परब, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्ने, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व अन्य उपस्थित होते.

Back to top button