नाशिक : देवळालीत वाहतुकीचे तीन तेरा; पोलिसांचे दुर्लक्ष | पुढारी

नाशिक : देवळालीत वाहतुकीचे तीन तेरा; पोलिसांचे दुर्लक्ष

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील वाहतुकीवर नियंत्रण नसल्याने चारचाकी व दुचाकी वाहनधारक बेजबाबदारपणे जुने बसस्थानकासह इतर ठिकाणी रस्त्यालगतच वाहने उभी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करीत आहेत. याकडे पोलिस प्रशासन व कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने वाहतुकीचे वाजले तीन तेरा, अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

येथील जुन्या बसस्थानक येथून मनपाची बससेवा सुरू झाली आहे. मात्र, येथील रस्त्याच्या दुतर्फा चारचाकी व दुचाकी वाहने उभी असल्याने बसचालकांना कसरत करत बस चालवावी लागत आहे. जुन्या बसस्थानक तसेच रस्त्यावरती वाहने बेजबाबदारपणे उभी करून जात असल्याने पोलिस प्रशासन व कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याने वाहनधारक मुजोर झाले आहेत. जुने बसस्थानक येथे पोलिस चौकी असूनही पोलिस तर सोडाच, वाहतूक शाखेच्या पोलिसाचेही दर्शन होत नसल्याने वाहतूक कोंडीच्या समस्येने नागरिक त्रस्त झाले आहेत.

शहरातील वाहतूक वाढली आहे. बेशिस्त वाहनचालक कुठेही आपली वाहने पार्क करून जातात. त्याचा त्रास दुकानदार व स्थानिक नागरिकांना होतो. शहरात वाहतूक पोलिसांची नियुक्ती केल्यास बेशिस्त वाहनचालकांवर जरब बसेल. – आर. डी. जाधव, उपजिल्हाध्यक्ष, रिपाइं.

सध्या शहरातून शहर बससेवा सुरू झाली ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, वाहतूक कोंडीची समस्या गंभीर आहे. यावर नियंत्रणासाठी पोलिस असणे गरजेचे आहे. – सुरेश कदम, अध्यक्ष, गवळीवाडा मित्रमंडळ.

हेही वाचा:

Back to top button