नाशिक : तब्बल 'इतक्या' लाख जनतेची तहान भागवतात टँकर | पुढारी

नाशिक : तब्बल 'इतक्या' लाख जनतेची तहान भागवतात टँकर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मे महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम असून, ग्रामीण भागात सर्वाधिक झळा बसत आहेत. त्यासोबत ग्रामीण जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यस्थितीत 73 टँकरच्या साहाय्याने 1 लाख 47 हजार 370 नागरिकांची तहान भागविली जात आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात राज्यामधील अनेक जिल्ह्यांचे सरासरी तापमान 40 अंशांपलीकडे गेले आहे. नाशिक जिल्ह्यात कधी नव्हे, तो पारा 41.2 अंशांवर जाऊन ठेपला. त्यामुळे जनतेला तीव— उकाड्यासोबत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्या जिल्ह्यातील 10 तालुक्यांत 81 गावे आणि 135 वाड्या अशा एकूण 216 ठिकाणी 73 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. येवला तालुक्यात सर्वाधिक 19 टँकर सुरू आहेत. त्या माध्यमातून 28 गावे आणि 23 वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे.

सिन्नर तालुक्यात 13 टँकरच्या साहाय्याने 74 ठिकाणी पाणी वितरीत केले जाते. बागलाणला 10 टँकर धावत असून, चांदवडमध्ये 5, देवळ्यात दोन व इगतपुरीत 3 टँकर सुरू आहेत. याशिवाय मालेगावी 6, पेठ 7, सुरगाण्यात 6 व त्र्यंबकेश्वरला 2 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सुदैवाने अवर्षणग्रस्त नांदगावसह कळवण, नाशिक व निफाड तालुक्यात एकही टँकर सुरू नाही.

हेही वाचा :

Back to top button