नाशिक : पत्नी व मुलाला चाकूने मारहाण, वाद मिटविण्यास आलेल्या पोलिसांनाही केली शिवीगाळ | पुढारी

नाशिक : पत्नी व मुलाला चाकूने मारहाण, वाद मिटविण्यास आलेल्या पोलिसांनाही केली शिवीगाळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सैन्यदलातून निवृत्त झालेल्या एकाने पत्नी व मुलास चाकूने मारहाण केल्याची घटना देवळाली कॅम्प येथील रेस्ट कॅम्प रोडवर घडली.

वाद मिटवण्यासाठी आलेल्या पोलिसांनाही संशयिताने शिवीगाळ केल्याची फिर्याद पत्नीने देवळाली कॅम्प पोलिसांकडे केली आहे. पत्नीच्या फिर्यादीनुसार संशयित विजयसिंग धोंडू नरवाल (45) यांच्याविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा नरवाल यांच्या फिर्यादीनुसार संशयिताने शनिवारी (दि.28) सायंकाळी कुरापत काढून शिवीगाळ, मारहाण केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button