नाशिक : शहरात शनैश्वर जयंतीचा उत्साह, भक्तांकडून जय्यत तयारी | पुढारी

नाशिक : शहरात शनैश्वर जयंतीचा उत्साह, भक्तांकडून जय्यत तयारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
न्यायाची देवता असलेले शनिमहाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त सोमवारी (दि.30) भक्तांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. यानिमित्ताने शहर-परिसरातील शनिमंदिरांवर आकर्षक सजावट केली आहे. विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करर्‍यात आले.

कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी शनिजयंती उत्सव साजरा करता येणार असल्याने शनिभक्तांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण आहे. पंचवटीमधील शनिचौक येथील शनिमंदिरात जयंतीनिमित्ताने होमहवन व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार पेठेतील शनिमंदिर ट्रस्टतर्फे चार ते पाच दिवसांपासून मुलांसाठी निरनिराळ्या स्पर्धा घेण्यात येत आहेत. तसेच सोमवारी (दि.30) पहाटेपासून श्रींच्या अभिषेकासह महाआरती व अन्य कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले.

भद्रकाली चौक, स्नेहनगर, पंचवटीतील टकलेनगर, रामसेतू पूल परिसरासह शहर-उपनगरांमधील अन्य शनिमंदिरांत जयंतीची तयारी पूर्ण झाली आहे. भगवान शनिदेवांच्या मूर्तीची रंगरंगोटी करताना मंदिरे आकर्षक विद्युत रोेषणाईत न्हाऊन निघाली आहेत. तसेच विविधरंगी फुलांच्या माळांनी मंदिर-परिसर सजविण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button