नाशिक : चिकूच्या बागेत लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद | पुढारी

नाशिक : चिकूच्या बागेत लावलेल्या पिंजर्‍यात बिबट्या जेरबंद

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील फुलेनगर (माळवाडी) शिवारात चिकूच्या बागेत लावलेल्या पिंजर्‍यात शुक्रवारी (दि. 27) पहाटे बिबट्या जेरबंद झाला. गेल्या तीन दिवसांपासून परिसरात नर बिबट्याचा वावर होता.

आठवडाभरापूर्वी फुलेनगर शिवारात बिबट्या विहिरीत पडल्याची घटना घडली होती. त्यावेळी वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्याच्या आत बिबट्याने विहिरीतून पळ काढला होता. त्यानंतर बिबट्याने वसंत पठाडे यांच्या गोठ्यातील वासरावर हल्ला केल्याची घटना घडली. ग्रामस्थांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. शुक्रवारी पहाटे पठाडे यांच्या शेतातील पिंजर्‍यात बिबट्या अडकला.

मंगळवारी पहाटे फुलेनगर (माळवाडी) शिवारात वसंत रभाजी पठाडे यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करून त्यास जखमी केले होते. त्यानंतर या परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. गेल्या तीन दिवसांपासून परिसरात बिबट्याचे दर्शन घडत होते. घटनेची माहिती दिल्यानंतर वनविभागाच्या कर्मचार्‍यांनी बिबट्याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले.

हेही वाचा :

Back to top button