नाशिक : नांदगावला वृध्दाची आत्महत्या | पुढारी

नाशिक : नांदगावला वृध्दाची आत्महत्या

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा

वाखारी येथे खासगी वैद्यकीय सेवेत असलेले नारायण महारू सागर (६५) यांनी शुक्रवारी (दि.२७) नांदगाव उड्डाणपुलाजवळील लोहमार्गावर धावत्या मालगाडीखाली सकाळी 9.30 वाजता झोकून देत आत्महत्या केली. यावेळी टॅक्सीचालक भाऊसाहेब सोनवणे, सागर पाटील यांनी सागर यांना जखमी अवस्थेत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे रेल्वे पोलिसांकडून समजले आहे. डाॅ. सागर यांनी लोहमार्गालगत दुचाकी उभी करून उड्डाणपुलाखाली जाऊन बसले होते. यावेळी पेट्रोललिंगवर असलेल्या सुरक्षाबलाच्या जवानाने त्यांना तेथून हटकले. मात्र, त्यांनी तेथून माघारी न जाता येणा-या मालगाडीखाली झोकून देत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळले नसून या घटनेचा नांदगाव रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा :

Back to top button