गडहिंग्लजमधील जवानाचे जम्मू-काश्मीरमध्ये अपघाती निधन | पुढारी

गडहिंग्लजमधील जवानाचे जम्मू-काश्मीरमध्ये अपघाती निधन

हलकर्णी; पुढारी वृत्तसेवा : जम्मू-काश्मीरमधील ग्लेशियर-सियाचीन भागात २२ मराठा जवानांच्या बसला अपघात झाला. यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुक येथील जवानाचा मृत्यू झाला. प्रशांत शिवाजी जाधव (वय २७) असे मृत जवानाचे नाव आहे. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच तालुक्यात शोककळा पसरली आहे. शनिवारी (दि. २८) खास विमानाने त्यांचे पार्थिव बेळगाव येत आणण्यात येणार आहे. तर बसर्गे येथे अंत्यसंस्कार होणार आहे.

चांगली बातमी! मान्सूनसाठी अनुकूल स्थिती; पुढील २-३ दिवसांत केरळमध्ये दाखल होणार

प्रशांत हे २०१४ मध्ये बेळगाव येथे २२ मराठा लाईट इन्फंट्रीमधून सैन्य दलात भरती झाले होते. दरम्यान, आज सकाळी सातच्या सुमारास लेह स्टेशन होऊन संपूर्ण बटालियन सियाचीनसाठी विविध बसमधून जात होती. उंच डोंगर- कपारी खोल दरी असलेल्या रस्त्यावरून बस जात असताना प्रशांतची बस एका वळणावरती घसरली व खोल दरीत शौक नदीत कोसळली. या बसमध्ये २२ जवान व चार अधिकारी होते. यामध्ये सात जवानांचा मृत्यू झाला आहे.

Back to top button