नाशिक : पोलिसावर चॉपरने वार करणाऱ्याला कारावासाची शिक्षा | पुढारी

नाशिक : पोलिसावर चॉपरने वार करणाऱ्याला कारावासाची शिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

पोलिसासोबत झटापट करून चॉपरने वार करणाऱ्या संशयिताला न्यायालयाने तीन महिने साधा कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे. विनोद निवृत्ती आगळे (४०, रा. पंचवटी) असे या आरोपीचे नाव आहे.

दि. २८ नोव्हेंबर २०१८ रोजी मध्यरात्री पंचवटी कारंजा येथे विनोद आगळेने पोलिस अंमलदार माधव सांगळे यांच्यासोबत झटापट करून चॉपरने वार केला होता. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात विनोदविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक व्ही. डी. शार्दूल यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. योगेश कापसे यांनी युक्तिवाद केला. त्यात विनोद आगळेविरोधात गुन्हा शाबित झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. आर. राठी यांनी विनोदला तीन महिने साधा कारावास व एक हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार एम. एम. पिंगळे, डी. बी. खैरनार यांची कामकाज पाहिले.

हेही वाचा :

Back to top button