नाशिक : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात भाजयुमोचे एल्गार आंदोलन | पुढारी

नाशिक : पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात भाजयुमोचे एल्गार आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतीय जनता युवा मोर्चा नाशिक महानगरतर्फे रविवार कारंजा येथे राज्य सरकारविरोधात एल्गार आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा निषेध केला. केंद्र सरकारने दोन वेळा पेट्रोल व डिझेलचे दर कमी करूनदेखील महाराष्ट्रातील सरकार पेट्रोल व डिझेलचे दर कमी करत नसल्याने जनतेची पिळवणूक होत असल्याचा आरोप भाजयुमोने केला आहे.

केंद्र सरकारने पेट्रोलचे 9.50 तर डिझेलचे 7 रुपये दर कमी केले आहेत. असे असताना महाविकास आघाडी सरकार एक व दीड रुपयाने दर कमी करून जनतेची चेष्टा करत आहे. एकीकडे दारूवरील कर 50 टक्क्याने कमी केला तर दुसरीकडे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करत नसल्याचा निषेध करत युवा मोर्चाने एल्गार आंदोलन केले. आंदोलनानंतर युवा मोर्चा पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांना निवेदन सादर केले.

याप्रसंगी भाजयुमोचे अमित घुगे, देवदत्त जोशी, अजिंक्य साने, प्रतीक शुक्ल, धनंजय माने, राहुल कुलकर्णी, शिवा जाधव, पवन उगले, विजय बनछोडे, डॉ. वैभव महाले, संदीप शिरोळे, विपुल सुराणा, हर्षद वाघ, उमेश मोहिते, अक्षय गांगुर्डे, साक्षी दिंडोरकर, प्रवीण भाटे, राम डोबे, आदित्य दोंदे, राम बडगुजर, प्रशांत वाघ, रफिक शेख आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button