नाशिक : चांदवडला भरवस्तीत धाडसी घरफोडी | पुढारी

नाशिक : चांदवडला भरवस्तीत धाडसी घरफोडी

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
शहरातील भरवस्तीतील श्री संत गाडगेबाबा चौकात चोरट्यांनी धाडसी घरफोडी करीत, 35 हजार 700 रुपयांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह पोबारा केला. या घटनेबाबत सुरेंद्र भाऊसाहेब बागूल (40) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिली आहे. बागूल हे रविवारी (दि. 22) सायंकाळी कुटुंबीयांसह नाशिकला नातेवाइकांकडे कार्यक्रमासाठी गेले होते.

या संधीचा फायदा घेत, चोरट्यांनी रात्रीच्या वेळी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. यावेळी कपाटातील 16 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 4 हजार रुपये किमतीच्या कानातील सोन्याच्या बाळ्या, 3 हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे कुडके, 2 हजार रुपये किमतीचे चांदीचे तीन कडे, 700 रुपये किमतीची कंबरेची चांदीची साखळी, 10 हजार रुपये रोख असा एकूण 35 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. सोमवारी (दि. 23) शेजारच्यांनी घर उघडे असल्याचे पाहिले, तेव्हा घरात चोरी झाल्याचे समजले. यावेळी चांदवडचे पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. या घटनेबाबत अज्ञात चोरट्यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत परिसरात चोरीचे प्रमाण वाढल्याने पोलिसांनी गस्त घालण्याची मागणी होत आहे.

चोरटे सीसीटीव्हीत कैद – शहरातील श्री संत गाडगेबाबा चौकात दाटीवाटीने नागरिक राहतात. अशा भरवस्तीच्या ठिकाणी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. चोरीसाठी आलेले चोरटे एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत असून, त्यावरून चांदवड पोलिस चोरट्यांच्या मार्गावर असून, चोरटे लवकरच पोलिसांच्या जाळ्यात सापडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा:

Back to top button