नाशिक : झाडावरचे आंबे पाडताना विजेचा धक्का लागून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू | पुढारी

नाशिक : झाडावरचे आंबे पाडताना विजेचा धक्का लागून सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

नाशिक (सिडको)  : पुढारी वृत्तसेवा

लोखंडी पाइपने झाडावरचे आंबे काढत असताना पाईपमध्ये विजेचा प्रवाह उतरल्याने एका तीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर युवकाचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना इंदिरा नगर येथील राजसारथी सोसायटीत घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिरुद्ध अनिल धुमाळ (वय ३०) हा तरुण आपल्या आजोबांच्या घरी झाडावरील आंबे तोडण्यासाठी शिडीच्या सहाय्याने झाडावर चढला असतांना त्याच्या हातातील लोखंडी पाईपचा स्पर्श झाडाजवळून गेलेल्या उच्चदाबाच्या वीज वहिनीला झाल्याने त्यास विजेचा जोरदार धक्का बसला.

त्याधक्क्याने अनिरुद्ध झाडावरून खाली फेकला गेला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यास उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. दरम्यान सॉफ्टवेअर इंजिनिअरचा अचानक मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी इंदिरा नगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून व पो नी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुंदर कोकाटे अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button