पुणे : भाग्यश्री पाटील यांचा होणार राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान | पुढारी

पुणे : भाग्यश्री पाटील यांचा होणार राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान

पुणे : पुढारी वृत्तसेवा; पुण्यातील बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अॅड प्रताप परदेशी, माजी अध्यक्ष अॅड. शिवराज कदम जहागिरदार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

या निमित्ताने दिला जाणारा लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार उद्यानकृषी क्रांतीच्या जनक असलेल्या राईज अँड शाईन बायोटेकच्या चेअरमन व कार्यकारी संचालिका आणि डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ पिंपरीच्या प्र-कुलगुरु डॉ. भाग्यश्री पाटील, महाराष्ट्र आरोग्या विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉ. माधुरी कानिटकर आणि आंतरराष्ट्रीय बोन्साय तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता काळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, महावस्त्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पुरस्काराचे वितरण शुक्रवारी ( दिनांक २७ मे ) रोजी दुपारी १२ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार आहे. यावेळी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी श्री. दत्तमंदिराच्या १२५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेणा-या लक्ष्मीदत्त या कॉफीटेबल पुस्तकाचे प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते यावेळी होणार आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button