नाशिक : देवदर्शनासाठी जाणारे मालेगावचे पिता-पुत्र अपघातात ठार

नाशिक : देवदर्शनासाठी जाणारे मालेगावचे पिता-पुत्र अपघातात ठार

अहमदनगर/मालेगाव/
मनमाड : पुढारी वृत्तसेवा
देवदर्शनासाठी जाणार्‍या मालेगाव तालुक्यातील जळगाव चोंढी येथील लष्करी जवानाचा त्याच्या 13 वर्षीय मुलासह अपघातात मृत्यू झाला. नगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात सोमवारी (दि.23) सकाळी मालवाहू वाहनाला भरधाव कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने हा अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, त्यात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला.

भावाच्या वर्षश्राद्धासाठी सुट्टीवर आलेला लष्करी जवान बाजीराव त्रिंबक मिसगर (40) व ओम (साई) बाजीराव मिसगर (13, दोघे रा. जळगाव चोंढी, ता. मालेगाव, जि. नाशिक) हे कारने जेजुरीला देवदर्शनासाठी जात होते. नगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात हॉटेल सुवर्णज्योतनजीक पुढे चाललेल्या वाहनाला त्यांच्या कारने पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात दोघेही जागीच ठार झाले. कारचा वेग प्रचंड असल्याने अपघातात कारचा चक्काचूर झाला.घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. जवान बाजीराव मिसगर हा पंजाबच्या हिसार येथे कार्यरत होता. गेल्या वर्षी त्याच्या भावाचे निधन झाल्याने बाजीराव वर्षश्राद्धासाठी महिनाभराच्या सुट्टीवर आला होता. पिता-पुत्राच्या अपघाती मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगी,भाऊ असा परिवार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news