करसहायक मुख्य परीक्षा पेपर दुसरा | पुढारी

करसहायक मुख्य परीक्षा पेपर दुसरा

मागील लेखात आपण पेपर पहिला व राज्य उत्पादन शुल्क यासाठी माहिती घेतली. या लेखात आपण करसहायक पेपर दुसरा याचा अभ्यासक्रम व संदर्भ पाहू. हा पेपर 27 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे.

चालू घडामोडी : दैनिक व दर आठवड्याच्या सर्व दैनिकांच्या रविवारच्या पुरवण्या.

बुद्धिमत्ता चाचणी : किरण पाटील किंवा अभिनव प्रकाशन.

भारतीय राज्यघटना : इंडियन पॉलिटिक्स – लक्ष्मीकांत किंवा भारताचे शासन आणि राजकारण – व्ही. बी. पाटील.

माहितीचा अधिकार : के. सागर प्रकाशन.

नागरिकशास्त्र – पंचायत राज : के सागर प्रकाशन किंवा प्रदीप लोंढे.

अंकगणित : महाले किंवा पंढरीनाथ राणे.

पुस्तकवाचनन व लेखाकर्म : यामध्ये लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पद्धतीची मूलभूत तत्त्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकीर्द, सहायक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीजपत्रक, घसारा, अंतिम लेखे वित्तीय विवरण पत्रके तयार करणे, नफा न कमविणार्‍या संस्थांची खाती.

यासाठी संदर्भ : अकरावी, बारावी कॉमर्सचे पुस्तकवाचन व लेखाकर्म हे पुस्तक. सोबत पुस्तकवाचन व लेखाकर्म – ज्ञीरसरी व अभिजित बोबडे.

आर्थिक सुधारणा व कायदे : पार्श्‍वभूमी, उदारीकरण, खासगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्‍ती, मर्यादा, केंद्र व राज्यस्तरावरील आर्थिक सुधारणा, थढज तरतुदी आणि सुधारणा आणि त्यांचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्‍न व समस्या, ॠडढ, विक्रीकर, तअढ.

संदर्भ – आर्थिक सुधारणा कायदे ज्ञीरसरी अर्थव्यवस्था – अनिल सत्रे, भारतीय अर्थव्यवस्था – देवयानी देशपांडे.

लिपिक – टंकलेखक मुख्य परीक्षा पेपर दुसरा

हा पेपर 13 ऑगस्ट 2022 रोजी होणार आहे. पेपर पहिला अनिवार्य असून याची माहिती आपण घेतली आहे.
या पेपरमध्ये सामान्यज्ञान इतिहास, भूगोल व नागरिकशास्त्र यांचा समावेश आहे.
इतिहास : आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
संदर्भ : 11 वी स्टेट बोर्ड जुने पुस्तक. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – कठारे किंवा गाढाळ.
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – केसागर.
भूगोल – महाराष्ट्राच्या संदर्भात यामध्ये पृथ्वी, जगातील विभाग हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी.
संदर्भ : महाराष्ट्राचा भूगोल – सवदी

6 वी ते 12 वी भूगोल
नागरिकशास्त्र : यामध्ये भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन.
संदर्भ : ग्रामप्रशासन, विद्या प्रकाशन
पंचायतराज : के. सागर प्रकाशन
बुद्धिमत्ता चाचणी : किरण पाटील किंवा नितीन महाले
गणित : यामध्ये अंकगणित, बीजगणित, भूमिती सांख्यिकी यांचा समावेश आहे. ठ. ड. असरीुरश्र मराठी अंकगणित – पंढरीनाथ राणे.
सामान्यविज्ञान : अनिल कोलते किंवा सचिन मस्के किंवा केसागर ल्युसेन्ट
चालू घडामोडी : अभिनव प्रकाशन.
माहितीचा अधिकार : के. सागर
संगणक व माहिती तंत्रज्ञान : के. सागर

Back to top button