नाशिक : ग्रामपंचायतींसाठी अवघे 49 उमेदवारी अर्ज तर कळवण, नांदगावमधून शून्य नामनिर्देशन | पुढारी

नाशिक : ग्रामपंचायतींसाठी अवघे 49 उमेदवारी अर्ज तर कळवण, नांदगावमधून शून्य नामनिर्देशन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या 191 रिक्त पदांसाठी शुक्रवारी (दि. 20) अर्ज भरायच्या अखेरच्या अंतिम मुदतीपर्यंत केवळ 49 नामनिर्देशन दाखल झाले. कळवण व नांदगावमधून एकही अर्ज आला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, सोमवारी (दि.23) अर्जांची छाननीची प्रक्रिया पार पडणार आहे.

राज्यामध्ये राजीनामा, सदस्याचे निधन आणि अपात्रतेची कारवाई तसेच अन्य कारणांनी रिक्त असलेल्या ग्रामपंचायतींच्या जागांसाठी पोटनिवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. जिल्ह्यातील 11 तालुक्यांमधील 118 ग्रामपंचायतींमधील 191 जागांचा यात समावेश आहे. या सर्व ठिकाणी शुक्रवारी (दि.20) नामनिर्देशनाच्या अंतिम दिवसापर्यंत केवळ 49 उमेदवारांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. मालेगाव तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींमधील 18 जागांसाठी सर्वाधिक 25 अर्ज आले आहेत. तर नाशिक तालुक्यात 12 जागांसाठी 6 अर्ज उमेदवारांनी दाखल केले आहेत. निफाड व बागलाणला प्रत्येकी दोन तसेच चांदवड व सिन्नरला प्रत्येकी 5 जणांचे अर्ज आले. याशिवाय त्र्यंबकेश्वर, इगतपुरी व दिंडोरीत प्रत्येकी एक अर्ज आला आहे. कळवण आणि नांदगाव तालुक्यात एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. दरम्यान, सोमवारी (दि.23) सकाळी 11 पासून दाखल अर्जांची छाननी करण्यात येईल. तसेच 25 तारखेला दुपारी 3 पर्यंत उमेदवारी माघारीची मुदत असेल. तसेच आवश्यकता भासल्यास प्रशासनाकडून 6 जून रोजी मतदान घेण्यात येईल.

हेही वाचा :

Back to top button