नाशिक : इंदिरानगरला घरफोडी ; सोन्याचे कर्णफुले, चांदीच्या वस्तू चोरीला | पुढारी

नाशिक : इंदिरानगरला घरफोडी ; सोन्याचे कर्णफुले, चांदीच्या वस्तू चोरीला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
घरफोडी करत अज्ञात चोरट्यांनी 36 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र भगवानदास नावरे (55, रा. बालाजी पॅलेज, वडाळा-पाथर्डी रोड, इंदिरानगर) यांच्या बंद घराच्या मुख्य दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. घरातील सोन्याचे कर्णफुले तसेच चांदीच्या वस्तू असा 36 हजार 200 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button