धुळे : ओबीसी आरक्षणासाठी भाजपची प्रतिकात्मक कुंभकर्णाच्या प्रतिमेला भाला टोचून निदर्शने | पुढारी

धुळे : ओबीसी आरक्षणासाठी भाजपची प्रतिकात्मक कुंभकर्णाच्या प्रतिमेला भाला टोचून निदर्शने

धुळे; पुढारी वृत्तसेवा : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलने महाविकास आघाडीचा निषेध करीत निदर्शने केली. यावेळी प्रतिकात्मक कुंभकर्णाच्या पोस्टरला भाला टोचून त्याला झोपेतून जागे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आज भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी विभागाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या चुकीमुळे ओबीसी आरक्षण गेल्याच्या आरोप यावेळी करण्यात आला. शहरातील कराचीवाला खुंटावर हे आंदोलन करण्यात आले. यात एका पोस्टरवर कुंभकर्णाची प्रतिमा तयार करण्यात आली. या पोस्टरला भाला टोचून फोटोतील कुंभकर्णाला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न करणारे आंदोलन यावेळी करण्यात आले. महाविकास आघाडीचे सरकार अशाच पद्धतीने कुंभकर्ण झोप घेत असून त्याला या आंदोलनाच्या माध्यमातून उठवण्याचे काम करण्यात आले.

महाराष्ट्रातील आघाडी सरकार अडीच वर्ष झाले. तरी झोपेचे सोंग घेऊन आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुन्हा मध्य प्रदेश राज्य सरकारने मिळवून दिले. परंतु आघाडी सरकारने कुंभकर्णाप्रमाणे झोपेचे सोंग घेतले आहे. याच्या निषेधार्थ ढोल-नगारे घेऊन आंदोलन करण्यात आले. आंदोलनात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष हिरामण गवळी, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष दिनेश बागुल, युवक जिल्हाध्यक्ष विकी परदेशी, नगरसेवक प्रतिभाताई चौधरी, भारतीताई माळी, स्नेहल जाधव, वंदना भामरे, नागसेन बोरसे, चेतन मंडोरे आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचलंत का ? 

Back to top button