धुळे : स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्रात महिलेची फसवणूक ; तिघांवर गुन्हा दाखल | पुढारी

धुळे : स्टेट बँक ग्राहक सेवा केंद्रात महिलेची फसवणूक ; तिघांवर गुन्हा दाखल

धुळे : (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा

येथील स्टेट बॅंक ग्राहक सेवा केंद्रात महिलेने बचत खात्यात भरण्यासाठी दिलेली रक्कम प्रत्यक्ष न भरता तिचा अपहार केल्याची तक्रार पोलिसांत करण्यात आली असून ग्राहक केंद्र चालविणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या महिलेसह इतरांचीही त्यांनी अशीच फसवणूक केल्याचे या तक्रारीत नमुद केले आहे.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यामधील कड्याळे पो. बल्हाणे येथे रहाणा-या कलुबाई राजमल चौरे या ३२ वर्षीय महिलेने पोलिसांत फिर्याद दिली असून स्टेट बँक ऑफ इंडिया (शाखा पिंपळनेर) च्या खालीच बँकेचे ग्राहकसेवा केंद्र आहे. या ठिकाणी कलुबाई चौरे यांनी दि. २ मार्च २०२२ ते २१ मार्च २०२२ दरम्यान त्यांच्या बचत खात्यात भरण्यासाठी म्हणून पैसे जमा केले होते. मात्र ग्राहक सेवा केंद्रातील तिघांनी प्रत्यक्ष पैसे भरले नाही. अशीच फसवणूक इतर ग्राहकांचीही झाली असून ती रक्कम तब्बल ७९ हजार रूपये इतकी आहे. या प्रकरणी कलुबाई चौरे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत ग्राहक सेवा केंद्रातील विक्की गावीत, अक्षय भामरे व शैलेश कुवर या तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास असई. पी. डी. अमृतकर करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button