पुढारी ऑनलाईन डेस्क : ग्लेन मॅक्सवेल (18 चेंडू, 5 चौकार, दोन षटकार, नाबाद 40)ने केलेल्या धमाकेदार फटकेबाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB) गुजरात टायटन्सचा 8 गडी राखून पराभव केला. मॅक्सवेलच्या या विजयी खेळीने RCB ला प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा जिवंत ठेववण्यात यश आले आहे. पण, असे असले तरी त्यांने प्लेऑफमध्ये स्थान पक्के होण्यासाठी सर्व भवितव्य मुंबई इंडियन्सच्या हाती आहे. शनिवारच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात केल्यास RCB टॉप-4 साठी पात्र ठरेल. आरसीबीचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेललाही (Glenn Maxwell) मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करून आरसीबीला मदत करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
मॅक्सवेल म्हणाला, 'आम्ही मुंबई-दिल्ली सामन्यावर लक्ष ठेवू. मला गोल्फ खेळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे काही पुनर्वसन होईल. पण मला वाटतं मुलं खूप फोकस करतात. या वर्षात या संघाने घेतलेल्या परिश्रम आणि परिश्रमामुळे संघ अंतिम-4 मध्ये पोहोचण्यास पात्र आहे असे दिसते. आशा आहे की मुंबई इंडियन्स आम्हाला अंतिम-4 मध्ये घेऊन जातील. (Glenn Maxwell)
मॅक्सवेल म्हणाला, 'आम्ही मुंबई-दिल्ली सामन्यावर लक्ष ठेवून आहे. मला गोल्फ खेळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. आमच्या आरसीबी संघाचे सर्व खेळाडू फोकस्ड आहेत. यंदा आमच्या संघाने घेतलेल्या परिश्रमाच्या जोरावर आम्ही अंतिम-4 मध्ये पोहोचू शकू अशी आशा आहे. त्यातच मुंबई इंडियन्स दिल्लीचा पराभव करून आम्हाला अंतिम-4 मध्ये पोहचवेल असाही विश्वास त्याने व्यक्त केला. (Glenn Maxwell)
लखनौ विरुद्धच्या आपल्या खेळीबद्दल बोलताना मॅक्सवेल म्हणाला, 'मला कधीच चेंडू वाया घालवायचा नसतो. त्यातच कालच्या सामन्यात मी सुरुवातीचे चेंडू जोरदार फटके लगावत कोहलीवरचा दबाव दूर करण्याचा प्रयत्न केला. आम्ही लय कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील होतो. पहिल्या चेंडूवर मी बाद झालो असतो तर फारसा फरक पडला नसता, पण जर मी काही चेंडू वाया घालवून मैदानावर असतो तर प्रतिस्पर्धी गुजरातला गती मिळू शकली असती. (Glenn Maxwell)