खेड : गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारा ट्रक पकडला

खेड; पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील विशेष पथकाने मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूने भरलेले हजारो बॉक्स जप्त केले आहेत. लवेल (ता. खेड) येथे ही कारवाई करण्यात आली असून ट्रकसह चालकाला ताब्यात घेतले आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाने गुरुवारी लाखो रुपये किंमतीची गोवा बनावटीची दारू गोव्याहून मुंबईच्या दिशेला जाणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष पथकाने खेड येथील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासह लवेल गावानजीक सापळा रचला होता. गोवा बनावटीच्या दारूने भरलेला संशयित ट्रक लवेल येथे येताच अधिकाऱ्यांनी कारवाई केली. ट्रकची झडती घेतली असता विदेशी गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या आढळून आल्या. दारूच्या बाटल्यांनी भरलेले ट्रक व चालक यांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचलंत का ?
- Pegasus : पेगासस चौकशी समितीला अहवाल सादर करण्यासाठी चार आठवड्यांची मुदतवाढ
- बोंबला! पुतीनच्या मुलीचं ‘झेलेन्स्की’बरोबर लफडं; एक मुलगीदेखील…
- नातेवाईक म्हणायचे; शॉर्ट्स मत पहनो…पण ‘ती’च आज बनली ‘वर्ल्ड चॅम्पियन’, वाचा निखत झरीनच्या संघर्षाची कहाणी