नाशिक : पंचवटीत पिता-पुत्राची सामूहिक आत्महत्या | पुढारी

नाशिक : पंचवटीत पिता-पुत्राची सामूहिक आत्महत्या

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
पंचवटीतील सीतागुंफा परिसरात राहणार्‍या पिता-पुत्राने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. येथील गुरुदत्त कला व क्रीडा मित्रमंडळाचे कार्याध्यक्ष तसेच सामाजिक कार्यकर्ते जगदीश जाधव, प्रणव जाधव अशी मृत पिता-पुत्राची नावे आहेत.

गुरुवारी (दि. 19) सकाळी 7 च्या सुमारास ही घटना उघडकीस आली. दोन दिवसांपूर्वी जगदीश जाधव यांचा वाढदिवस होता. यंदा त्यांनी तो एकदम साध्या पद्धतीने आणि कुटुंबीयांसोबत साजरा केला होता. तर मुलगा प्रणव हा महाविद्यालयीन विज्ञान शाखेत शिक्षण घेत होता. वडील आणि मुलाच्या सामूहिक आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र, दोघांनी आत्महत्या का केली? आत्महत्या करण्यामागचे नेमकं कारण काय? या बाप-लेकाने इतके टोकाचे पाऊल का उचलले? असे अनेक प्रश्न पंचवटीकरांनी उपस्थित केले आहेत. शवविच्छेदनानंतर या दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसून पंचवटी पोलिस अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, जगदीश जाधव यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचा :

Back to top button