नाशिक : 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद | पुढारी

नाशिक : 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद

नाशिक : गंगापूर आणि मुकणे धरणामधून पाणीउपसा करणार्‍या पंपिंग स्टेशन येथील पावसाळापूर्व कामे हाती घेण्यात येणार असल्याने शनिवारी (दि.21) दिवसभर वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेनेदेखील या दिवशी जलवाहिन्यांशी संबंधित देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतल्याने शनिवारी (दि.21) संपूर्ण शहराचा दुपारी व सायंकाळचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

दरम्यान, रविवारी (दि.22) सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. तर दुपारनंतर पाणीपुरवठा नियमित होईल. मनपाचे गंगापूर धरण रा. वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीकडील अ132 के. व्ही. सातपूर ब तसेच 132 के. व्ही. महिंद्रा या दोन एक्स्प्रेस फिडरवरून जॅकवेलसाठी 33 के. व्ही. वीजपुरवठा कार्यान्वित आहे. मुकणे धरण रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीने रेमंड सबस्टेशन गोंदे येथून 33 के.व्ही वीजपुरवठा दिला आहे. या केंद्रांवरील महावितरणकडून ओव्हरहेड लाइन व सबस्टेशनची पावसाळापूर्व कामे करण्यासाठी शनिवारी (दि.21) सकाळी 9 ते सायंकाळी 6 या कालावधीत वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नाशिक पश्चिम व पंचवटी विभागामार्फत जलशुध्दीकरण केंद्रांकडे जाणारी अशुध्द पाण्याची मुख्य गुरुत्ववाहिनी गोदावरी नदीच्या उजव्या व डाव्या बाजूला दुरुस्त करण्यात येणार आहे. तसेच सिडको, सातपूर विभागामार्फत अशुध्द पाण्याची मुख्य गुरुत्ववाहिनी दुरुस्त करण्यात येणार असल्याने या दोन्हीही ठिकाणाहून होणारा संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा शनिवारी (दि.21) बंद ठेवून संबंधित कामे करता येणार असल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

हेही वाचा :

Back to top button