नाशिक : पोलिस आयुक्तांची अचानक सातपूर पोलिस ठाण्याला भेट | पुढारी

नाशिक : पोलिस आयुक्तांची अचानक सातपूर पोलिस ठाण्याला भेट

सातपूर : पुढारी वृत्तसेवा
नाशिकचे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी सातपूर पोलिस ठाण्याला अचानक भेट देत येथे सुरू असलेल्या नवीन इमारतीच्या कामाची पाहणी करत काम लवकर पूर्ण करण्याच्या ठेकेदाराला सूचना केल्या.

सुमारे 42 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या सातपूर पोलिस ठाण्याची इमारत जीर्ण झाल्याने आ. सीमा हिरे यांनी शासनाकडे निधीची मागणी केली होती. महाराष्ट्र पोलिस हाऊसिंग वेल्फेअर कॉर्पोरेशनने सुमारे सहा कोटींचा निधी मंजूर करत ग्रीन इमारतीच्या कामाला दीड वर्षापूर्वी मंजुरी दिली. या कामाला 12 महिन्यांची मुदत असूनही कोरोनामुळे अद्यापपर्यंत हे काम पूर्ण झाले नसल्याचे ठेकेदार सांगत असला तरी काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. दरम्यान, रविवारी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी अचानक सातपूर पोलिस ठाण्याला भेट देत नवीन इमारतीचे बांधकाम, इमारतीत पोलिस अधिकारी-कर्मचार्‍यांसाठीच्या सोयी सुविधा याची माहिती घेत सूचना केल्या. यावेळी वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण, सतीश घोटेकर, धुमाळ, डी. के. पवार, सुरेश तुपे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button