नाशिक : शहर काँग्रेस सेवा दलातर्फे दर गुरुवारी लोकसंवाद दिन | पुढारी

नाशिक : शहर काँग्रेस सेवा दलातर्फे दर गुरुवारी लोकसंवाद दिन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहर काँग्रेस सेवा दलातर्फे दर गुरुवारी काँग्रेस कमिटी एमजी रोड नाशिक येथे सकाळी 11 ते 3 या वेळेत काँग्रेस सेवा दलातर्फे लोकसंवाद दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोकसंवाद दिनाचे उद्दिष्ट नाशिकमधील नागरिकांना विविध प्रश्नांना सामोरे जावे लागत असून, अनेक शासकीय व अशासकीय संस्थेमध्ये नागरिकांची कामे होत नाहीत. अशा परिस्थितीत त्या नागरिकांना काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून मदत करून त्यांच्या प्रश्नांचा शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून लोकसंवाद दिन दर गुरुवारी सुरू करण्यात येत आहे. नाशिककरांना आपल्याला येणार्‍या अडीअडचणी या आपण लेखी स्वरूपात काँग्रेस कमिटी येथे दर गुरुवारी सकाळी 11 ते 3 यावेळेत आमच्याकडे द्याव्यात, त्यासंदर्भात संबंधित कार्यालयाशी पाठपुरावा करून आपल्याला काँग्रेस सेवा दलाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याकरिता प्रयत्नशील राहू, असे नाशिक शहर काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी कळविले आहे.

हेही वाचा :

Back to top button