नाशिक : मान्सूनपूर्व तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या बैठक | पुढारी

नाशिक : मान्सूनपूर्व तयारीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्या बैठक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याच्या मान्सूनपूर्व आढावा बैठकीला अखेर मुहूर्त लागला आहे. जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (दि.18) सकाळी 11 ला ही बैठक पार पडणार आहे. अंदमानात मान्सून डेरेदाखल झाला आहे. पुढील पाच दिवसांमध्ये केरळसह तळकोकणामध्ये मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. मात्र, एकीकडे मान्सूनच्या आगमनाचे वेध लागले असताना जिल्हा प्रशासनाकडून मान्सूनपूर्व बैठकीची कोणताही तयारी झालेली नव्हती. परिणामी आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

वास्तविक दरवर्षी एप्रिलअखेर किंवा मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रशासन बैठक घेते. पण, चालू वर्षी बैठकीची साधी चर्चादेखील नव्हती. त्यातच विभागीय आयुक्तालयाने यापूर्वीच बैठक मान्सूनसाठी आम्ही सज्ज असल्याचे दाखवून दिले. परिणामी, जिल्हा प्रशासनाच्या कारभारावर बोट उठविले जात होते. दरम्यान, बैठकीबाबत उशिराने का होईना प्रशासनाला जाग आली आहे. बुधवारी (दि.18) जिल्हाधिकार्‍यांनी मान्सूनपूर्व बैठक बोलविली असून, त्यामध्ये ते तयारीचा आढावा घेणार आहेत. बैठकीसाठी विविध विभागांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्हावासीयांचा जीव भांड्यात पडला आहे.

साहित्याची जुळवाजुळव
जिल्ह्यात मागील तीन वर्षांची पावसाने वार्षिक सरासरी गाठली. 2019 मध्ये गोदावरी व अन्य नद्यांचा महापूर नागरिकांनी अनुभवला. त्यामुळे मागील अनुभव गाठीशी असल्याने शासकीय यंत्रणांनी बैठकीची प्रतीक्षा न करता मान्सूनमधील आपत्ती निवारणासाठी आवश्यक साहित्याची जुळवाजुळव सुरू केली आहे.

हेही वाचा :

Back to top button