अंबाबाई मंदिरातील फरशी काढण्याचे काम 60 टक्के पूर्ण | पुढारी

अंबाबाई मंदिरातील फरशी काढण्याचे काम 60 टक्के पूर्ण

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील फरशी काढण्याचे काम 60 टक्के पूर्ण झाले. आता गरुड मंडप व गाभारागृहातील फरशी काढण्यात येणार आहे. संपूर्ण काम झाल्यावर मूळ दगडी स्थापत्याच्या पॉलिशसाठी 15 दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी सांगितले.

फरशी काढण्याची मोहीम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या अंतर्गत कासव चौक, सरस्वती व महाकाली चौक, गणपती चौकातील फरशी काढण्यात आली आहे. उर्वरित फरशी काढल्यानंतर पॉलिशचे काम हाती घेण्यात येणार आहे.

Back to top button