केतकी चितळे विरोधात धुळ्यातही गुन्हा दाखल | पुढारी

केतकी चितळे विरोधात धुळ्यातही गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या संदर्भात वादग्रस्त पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळे च्या विरोधात अखेर धुळे तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासंदर्भात अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवरून वादग्रस्त पोस्ट केल्यामुळे धुळ्यात संतप्त वातावरण तयार झाले होते. राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष रणजित भोसले यांच्यासह माजी जिल्हाध्यक्ष किरण शिंदे यांनी पोलीस प्रशासनाला पत्र देऊन पवार यांची बदनामी करणारे चितळे यांच्यासह भाजपच्या आयटी सेलच्या संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. यासाठी निदर्शने करण्यात आली होती. यासंदर्भात आता धुळे तालुका पोलीस ठाण्यात किरण शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अभिनेत्री केतकी चितळे च्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल या उद्देशाने अशा पद्धतीची वादग्रस्त पोस्ट केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा :

Back to top button