नाशिक : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा शिदवाडीकरांशी संवाद, ‘या’ समस्यांवर चर्चा | पुढारी

नाशिक : पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचा शिदवाडीकरांशी संवाद, 'या' समस्यांवर चर्चा

नाशिक  (इगतपुरी/घोटी) : पुढारी वृत्तसेवा
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौर्‍यावर आले असताना खंबाळे येथील शिदवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधत येथील पाणीप्रश्न जाणून घेतला. शिदवाडी येथील महिलांनी गावातील समस्यांबाबत चर्चा केली केली. ना. ठाकरे यांनी पाणीप्रश्न तत्काळ मार्गी लावण्याच्या अधिकार्‍यांना सूचना दिल्या.

खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, निर्मला गावित यांनी चर्चेत सहभाग घेतला होता. दरम्यान, खंबाळे ग्रामपंचायतीला तलाव सुशोभिकरणासाठी देखील भरीव निधी देण्यात आला असून या तलावाचे काम लवकरात लवकर होणार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी येथील एक कोटी 92 लाखांच्या पाणीपुरवठा योजनेबाबत नागरिकांशी पर्यटनमंत्री ठाकरे यांनी संवाद साधला. खंबाळे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच द्वारका शिद, उपसरपंच दिलीप चौधरी, ग्रामविकास अधिकारी डी. बी. घडवजे आदींनी प्रश्न मांडले.

यावेळी जिल्हाधिकारी गंगाथरण डी., शिवसेना उपनेते आदेश बांदेकर, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुनील बागुल, विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर, उप जिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, पांडुरंग बरोरा, नाशिकचे नगरसेवक विलास शिंदे, तालुकाप्रमुख भगवान आडोळे, उपतालुका प्रमुख कुलदीप चौधरी, ज्येष्ठ नेते रमेश गावित, राजेंद्र नाठे, प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार परमेश्वर कासुळे, विठ्ठल लंगडे, रमेश धांडे, संजय आरोटे, रामदार भोर आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

‘शाश्वत योजनेमुळे टंचाईच्या झळा शमणार’
धरणांच्या तालुक्यात मे महिन्यात मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या झळा बसत असतात. मात्र, शाश्वत पाणीपुरवठा योजना कमी होत असल्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. मात्र आज प्रत्यक्षात ना. आदित्य ठाकरे यांनी शिदवाडी येथील पाणी प्रश्नासंदर्भात महिलांशी संवाद साधला. त्यामुळे येथील पाणी प्रश्न कायमचा मिटेल, असा आशावाद माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, निर्मला गावित यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button