नाशिक : मनसेच्या महिला पदाधिकार्‍यांना न्यायालयाचा दिलासा, हद्दपारीस स्थगिती | पुढारी

नाशिक : मनसेच्या महिला पदाधिकार्‍यांना न्यायालयाचा दिलासा, हद्दपारीस स्थगिती

नाशिक : मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हद्दपार असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सहा महिला पदाधिकार्‍यांच्या कारवाईस न्यायालयाने स्थगिती आदेश दिले आहेत.

त्यामुळे मनसेच्या महिला पदाधिकारी सुजाता डेरे, कामिनी दोंदे, अक्षरा घोडके, अरुणा पाटील, निर्मला पवार तसेच स्वागता उपासनी यांना न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने 4 मे रोजी मनसेच्या महिला पदाधिकार्‍यांनी भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीत मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजविण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे भद्रकाली पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव महिलांना ताब्यात घेत अटक केली होती. त्यांना 15 दिवसांसाठी हद्दपार करण्यात आले होते. या कारवाईविरोधात त्यांनी वकिलांमार्फत वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करून हद्दपारीची कारवाई रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बुधवारी (दि.11) झालेल्या सुनावणीत न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी येत्या 24 मेपर्यंत स्थगिती दिली आहे.

हेही वाचा :

Back to top button