सातारा : काम होणार असेल तरच नारळ फोडतो : आ. शिवेंद्रराजे | पुढारी

सातारा : काम होणार असेल तरच नारळ फोडतो : आ. शिवेंद्रराजे

मेढा (सातारा) : पुढारी वृत्तसेवा
काहीतरी करतोय, हे दाखवण्यासाठी किंवा कोणाच्या समाधानासाठी नाही तर काम पूर्ण होणार असेल तरच मी विकासकामांचे नारळ फोडतो, असे प्रतिपादन आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केले. सांगवी तर्फ मेढा येथील शिवतेज मित्र मंडळ आयोजित ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे, सागर धनावडे, सुतार आदी उपस्थित होते.

आ. शिवेंद्रराजे म्हणाले, मी कार्यक्रमासाठी मोकळा नाही आलो तर पैसे घेऊनच आलोय. त्यामुळे कामाची चिंता कोणी करू नये. धार्मिक कार्यक्रमात असल्याने राजकीय काय बोलणार नाही. तुमचा कार्यक्रम 22 वर्षे सुरु असला तरी मी काय 22 वर्षे तालुक्यात नव्हतो त्यामुळे मागील हिशोब माझ्याकडे नको, अशी मिश्कील टिप्पणीही त्यांनी केली.

शिवतेज मंडळाच्या कार्याचे कौतुक करून असे धार्मिक कार्यक्रम राबवणे आपली संस्कृती असल्याने त्याची जपणूक करूया, असे आवाहन आ. शिवेंद्रराजे यांनी केले.प्रारंभी गांजे-सांगवी रस्त्याचे भूमिपूजन तसेच सांगवी येथील श्री घाटाई देवी मंदिर परिसरात पेव्हरब्लॉक बसवणे या कामाचे भूमिपूजन आ. शिवेंद्रराजे भोसले व जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

Back to top button