नाशिक : 18 दिवसांपूर्वीच लग्न झाले; नदी पात्रात उडी घेऊन संपवले जीवन | पुढारी

नाशिक : 18 दिवसांपूर्वीच लग्न झाले; नदी पात्रात उडी घेऊन संपवले जीवन

घोटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा
इगतपुरी तालुक्यातील मोगरे येथील विवाहितेने सासरच्या त्रासाला कंटाळून नदीपात्रात स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पती व सासरा यांना अटक करण्यात आली आहे. मोहिनी राहुल जाखेरे असे मृत विवाहितेचे नाव आहे.

बांबळेवाडी येथील मोहिनी हिचे मोगरे येथील राहुल एकनाथ जाखेरे याच्याशी 18 दिवसांपूर्वी लग्न झाले होते. विवाहितेच्या वडिलांनी लग्नात अंगठी व मानपान दिला नाही म्हणून सतत त्रास दिला जात होता, असे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही बाजूच्या नातेवाइकांनी समजूत घालून पुन्हा मोहिनी हीस नांदावयास पाठवले होते. मात्र, काही दिवसांतच मोहिनी ही बेपत्ता झाल्याची तक्रार सासरच्या वतीने पोलिसांत दाखल करण्यात आली. नऊ दिवसांनंतर मोहिनी हिचा मृतदेह दारणा नदीपात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली.

हेही वाचा :

Back to top button