विट्यात सावकाराविरुद्ध गुन्हा | पुढारी

विट्यात सावकाराविरुद्ध गुन्हा

विटा ; पुढारी वृत्तसेवा : घेतलेल्या पैशाची परतफेड करूनही व्याजाच्या जादा पैशाची मागणी करून शिवीगाळ व धमकी देणार्‍या सागर सनातन पाटील (रा. साळशिंगे रोड, विटा) या सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्रफुल्ल प्रकाश मांडवेकर यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली.

फिर्यादीचे वडील प्रकाश मांडवेकर यांचा येथील विटा नगरपालिकेच्या गाळ्यांमध्ये चहाचा स्टॉल आहे. त्यांना 2016 मधील येथील सावकार सागर पाटील याने चार लाख रुपये कर्ज दिले होते. हे कर्ज देताना मासिक दहा टक्के व्याज दर सांगून 15 टक्के व्याज दर लावला. मांडवेकर यांच्याकडून कोरे धनादेश व स्टॅम्प पेपर तारण म्हणून घेतले. एकूण 13 लाख 41 हजार 280 रुपये परत करूनदेखील 15 टक्के व्याजाचे अधिक 5 लाख 61 हजार 280 रुपयांची

मागणी करीत शिवीगाळ करून तो धमकावत आहे. वारंवार घरात येऊन व मोबाईलवर शिवीगाळ करून पैसे न मिळाल्यास घरात घुसून मारीन अशी धमकी देत असल्याचे प्रफुल्ल मांडवेकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button